औरंगाबाद महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर ठेवले गेले असावे. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे..
इतिहास
औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे छोटसे ग्राम वसलेले होते. काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणार्या खुलताबाद या छोट्याश्या गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा पुढे हैदराबादच्या निझाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरवात झाल्यानंतर इ. स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरू झाले.मलिक अंबरने इथे त्याच्या कारकिर्दीत एक पाण-व्यवस्था उभारली होती, त्याच्या एका भागाचे नाव नाव नहर-ए-अंबरी जिचे अवशेष आजही दिसतात. तसेच येथे शहराच्या पाणचक्की भागात पुरातन लेणी कोरलेली आढळून येतात. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.
भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद अक्षांश उत्तर 19° 53' 47" - रेखांश पूर्व 75° 23' 54" याठिकाणी वसलेले आहे. शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगररांगांनी वेढलेले आहे.
तापमान: औरंगाबादचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सीअसदरम्यान असते.
शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्चदरम्यान आहे
पर्जन्यमान: पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते.
सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते.
नाट्यविश्व
औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाटकात महत्त्वाचे स्थान राखून आहे. अजित दळवी यानी अखिल महाराष्ट्रात गाजलेली काही नाटके लिहीली, अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, चिन्मयी सुर्वे अशा कलावंतानी आधी औरंगाबादला सुरूवात केली आणि मग ते मुंबईतील नाट्यक्षेत्रात चमकले. त्याआधी, कुमार, आलोक चौधरी, विजय दिवाण,त्र्यंबक महाजन अशा अनेक कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्याही. 'वर्हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मण देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते.
अर्थव्यवस्था
गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रिकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्कमिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.
उद्योगधंदे
अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमुहांचे प्रकल्प औरंगाबादेत आहेत. वानगीदाखल त्यापैकी काहींची नावे अशी
व्हिडीओकॉन
स्कोडा ऑटो
वोक्हार्ट
जॉन्सन एंड जॉन्सन
झीमन्स
गुडइयर
बजाज ऑटो
कोलगेट-पामोलिव्ह
केनस्टार
एंड्रेस ह्युजर
व्हीजन पेट्रोकेमिकल्स
प्रसिध्द शिक्षण संस्था
१)विद्यापीठ
औरंगाबाद शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते.
२)अभियांत्रिकी
शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय
मराठवाडा प्राद्यौगिकी संस्था(MIT)
म.गा.मि. जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय
पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय
हायटेक इंस्टीटूट आफ टेक्नोलॉजी, अभियांत्रिकी महाविद्यालय
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय
श्रि. साई अभियांत्रिकी महाविद्यालय
सावित्रीबाई फुले अभियांत्रिकी महाविद्यालय
श्रियश अभियांत्रिकी महाविद्यालय
३) वैद्यकीय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
म.गा.मि. वैद्यकीय महाविद्यालय
शासकीय दंतविद्या महाविद्यालय
भगवान होमियोपेथिक महाविद्यालय
फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक महाविद्यालय
वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी
४)कला, वाणिज्य आणि विज्ञान
सरस्वती भुवन महाविद्यालय
देवगिरी महाविद्यालय
विवेकानंद महाविद्यालय
पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय
डॊ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
मौलाना आझाद महाविद्यालय
वसंतराव नाईक महाविद्यालय
छत्रपती शिवाजी महाविद्यालय
मिलिंद महाविद्यालय
शासकीय महाविद्यालय
माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय
महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय
मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी
५)मॅनेजमेन्ट कॉलेज
मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेन्ट & रिसर्च
महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
मौलाना आ़झाद इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
प्रेक्षणीय स्थळे
अजिंठा लेणी
वेरूळ लेणी
घृष्णेश्वर मंदिर (ज्योतिर्लिंग)
दौलताबादचा किल्ला
बीबी का मकबरा
औरंगाबाद लेणी (बौद्ध)
पाणचक्की
खुल्ताबाद
दरवाजे
मुघल शासनकालात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिध्द आहेत
गौताळा अभयारण्य
म्हैसमाळ
संत ज्ञानेश्वर उद्यान
पैठण
जायकवाडी धरण पक्षी अभयारण्य
बीबी का मकबरा
( औरंगाबाद इथे अंदाजे १५०० सुफ़ी संताना दफनविण्यात आलेले आहे)