औरंगाबाद
औरंगाबाद महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर ठेवले गेले असावे. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे..
इतिहास
औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे छोटसे ग्राम वसलेले होते. काही इतिहासकारांच्या...